

प्रिय विद्यार्थ्यांनो !!
गुणवत्ता हाच आमचा ध्यास
यश असेल तुमचेच खास !
आमचे नाविन्य तुमची गती
यातूनच होईल तुमची प्रगती !
हसत खेळत व्हाल ज्ञान वंत
साऱ्यात असाल तुम्ही यशवंत !!
आज आपल्या समोर मोठी आव्हाने उभी आहेत. परंतु त्यांना सामोरे जाताना प्रत्येकाने आपले सामर्थ्य ओळखले पाहिजे.
आजच्या युगात गतीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्वतःचे आयुष्य समृद्ध होण्यासाठी संधीचे सोने करा . उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबाबरोबर फिरायला जा. छंद जोपासा.
संस्काराची शक्ती खूप मोठी असते.पूर्वी घराघरातून वडील माणसे लहान मुलांवर संस्कार करीत असत , पण आता ती परिस्थिती बदलली आहे. म्हणूनच हे संस्कार देण्याचे काम विद्यालयातील विविध उपक्रमांद्वारे करीत आहोत .
आपल्या पाल्याचे व्यक्तिमत्व घडवण्याची व त्याचे आयुष्य समृद्ध करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या पालकांचे विद्यालयात सहर्ष स्वागत !!
सौ.ज्योती दिपक शिंदे
मुख्याध्यापिका
मुख्याध्यापक मनोगत

विद्यालयाची वैशिष्ट्ये
॥ १ ली पासून सेमी इंग्रजी
॥ वैयक्तिक लक्ष
॥ अद्ययावत डिझीटल क्लासरूम व ई-लर्निंग अभ्यासक्रम
॥ विविध स्पर्धा परीक्षेत असंख्य विद्यार्थी गुणवत्ता यादीत
| बालस्नेही व रमणीय शैक्षणिक वातावरण
॥ स्कूल बसची सोय
॥ आरोग्य तपासणीसाठी व्हिजीटींग डॉक्टर
॥ क्रीडा स्पर्धांची तयारी व क्रीडागुणांची जोपासना.
॥ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग

उद्दिष्टे
· शिक्षणामुळे व्यक्तिमत्वाचा संपूर्ण व सर्वांगीण विकास होतो. विद्यार्थ्यांचा विविधांगी विकास करण्यासाठी शाळेमध्ये विविध शालेय व सहशालेय उपक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमातूनच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होते.
· विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधत असताना विद्यालयामध्ये विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमातून त्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कला गुणांचा विकास होतो. अशा उपक्रमातून नेतृत्वगुण, संस्कार, निरीक्षण, सृजनशीलता, सामाजिक बांधिलकीची जाणीव, संग्राहकवृत्ती, श्रवणक्षमता, सेवाभावीवृत्ती, राष्ट्रीय काम, राष्ट्रभक्ती, अभिनय कौशल्य इत्यादी क्षमतांचा विकास होतो व त्यामधूनच व्यक्तिमत्व उदयास येते.
· नवीन शैक्षणिक धोरण (NEP2020) नुसार प्राथमिक शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट केवळ पुस्तकी ज्ञान देणे नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे आहे. यासाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, बहुभाषिक शिक्षण, सर्वांगीण विकास, अनुभवात्मक शिक्षण आणि चिकित्सक विचार व लवचिक अभ्यासक्रम या मूलभूत उद्दिष्टांचा विचार केला आहे. त्याचबरोबर सामाजिक, भावनिक, शारीरिक, नैतिक व चारित्र्य विकास, पर्यावरण जागरूकता, उत्तम शैक्षणिक वातावरण, सर्जनशीलता व कला कौशल्य यावरही भर देण्यात आला आहे.
संस्कार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. शाळेमध्ये राबवले जाणारे विविध उपक्रम हे व्यक्तिमत्व विकासाठी प्राथमिक बीजारोपण असते. यामधूनच विद्यार्थ्यांच्या वर्तनात परिवर्तन घडून येते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
· विद्यार्थ्यांच्या जीवनातील शैक्षणिक काळ अत्यंत संवेदनशील व जडणघडणीस योग्य असल्यामुळे त्यांच्या सर्वांगीण बौद्धिक, नैतिक, शारीरिक, सामाजिक , अध्यात्मिक, विकासासाठी त्यांना समर्थ सुयोग्य व जबाबदार नागरिक घडविण्यासाठी अभ्यासपूरक उपक्रमच अत्यंत प्रभावी माध्यम आहे. सामाजिक व नवराष्ट्रनिर्मितीच्या परिवर्तनाची धुरा शिक्षण संस्थांवर सोपविण्यात आली आहे.
· डॉ. राधाकृष्ण म्हणतात "आपण एक संस्कृती घडवीत आहोत. कारखाना नाही. संस्कृतीचे मूल्य व श्रेष्ठत्व हे भौतिक समृद्धी अथवा शासकीय यंत्रणा यावर अवलंबून नसून माणसाच्या चारित्र्यावर अवलंबून आहे. म्हणून शिक्षकाचे प्रमुख काम चारित्र्यनिर्मिती हे आहे.आणि अभ्यासपूरक उपक्रम हेच चारित्र्य निर्मितीचे प्रमुख व प्रभावी साधन आहे.