
आमची सुविधा
प्राथमिक वयोगटातील विद्यार्थ्यांचे संबोध स्पष्ट होणे गरजेचे असते. विज्ञान , परिसर अभ्यास या विषयांचे संबोध स्पष्ट होण्यासाठी विद्यालयात स्वतंत्र अशी प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले जातात. प्रत्यक्ष कृतीतून दिलेले. शिक्षण दीर्घकाळ लक्षात राहते या हेतूने विद्यार्थ्यांना स्वतः प्रयोग करण्यास प्रोत्साहित केले जाते व विद्यार्थ्यांकडून सोपे प्रयोग करून घेतले जातात.
सुसज्ज प्रयोगशाळा

विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्राथमिक शाळेत सुसज्ज असे ग्रंथालय असून यामध्ये जवळपास 3500 पुस्तके आहेत.
अद्ययावत ग्रंथ संपदा व बालवाचनालय

आज कालच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक विद्यार्थी स ंगणक साक्षर झाला पाहिजे या दृष्टिकोनातून विद्यालयामध्ये सुसज्ज संगणक कक्ष उपलब्ध आहे. बालवाडी पासून इयत्ता चौथी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण दिले जाते.
अत्याधुनिक संगणक कक्ष

बालवाडी ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी विद्यालयामध्ये सी.सी टीव्ही यंत्रणा असून याद्वारे परिसरातील विद्यार्थ्यांच्यादृष्टीने अयोग्य हालचालींवर लक्ष ठेवता येते व लहान मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते.
सी. सी. टीव्ही ची सोय

विद्यार्थ्यांचे दृकश्राव्य संबोध संकल्पना स्पष्ट करून ते त्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहण्यासाठी अध्यापनात डिजिटल क्लासरूमचा वापर केला जातो.
डिजिटल क्लासरूम
